मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या 40 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली असून एका पोलिस अधिकारींनी सांगितले की, या घटनेचे काही कथित सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अतिरिक्त पोलिस उपायुक्त यांनी सांगितले की, सोमवार आणि मंगळवारी मध्यरात्री एका 20 वर्षीय तरुणाने सदर बाजार पोलिस स्टेशन परिसरात 40 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच ही महिला मानसिक आजाराने त्रस्त असून शर्मा म्हणाले की, “आरोपीने महिलेला रस्त्यावरून एकटी चालताना पाहिले. तो तिला सोबत घेऊन गेला, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून फरार झाला.