हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांकडून सर्व्हिस चार्ज घेणे आता बंधनकारक असणार नाही. केंद्र सरकारनं याबाबतच्या नियमांना मंजुरी दिली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये 5 ते 20 टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज घेतला जातो. सरकारने सर्व्हिस चार्जमधून ही सूट दिलेली असली तरी ग्राहकांना सर्व्हिस टॅक्समधून मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.