तुमच्या समोर समोसा आणि बर्गर दोन्ही गोष्टी ठेवून त्यापैकी एक निवडण्यास सांगितल्यास थोडा गोंधळच उडेल नाही. आरोग्यदायी खाणारे, डाइट करणारे तर दोन्ही गोष्टी फ्राइड आणि जंकफूड असल्यामुळे नाकारतील. पण या दोघांमध्ये तुम्हाला पौष्टिक आणि चविष्ट पर्याय निवडायचा असेल तर समोसा उजवा ठरेल. हे सेंटर फॉर सायन्स अॅण्ड इनव्हायरमेन्टचे सीएसई म्हणणे आहे.
समोसा ताज्या पदार्थांपासून बनवला जातो. समोसा बनवण्यासाठी लागणारे सर्वच पदार्थ म्हणजे अगदी मैद्यापासून ते उकडलेल्या बटाट्यांपर्यत सर्व काही गरम असतानाच त्यापासून समोसे बनवले जातात. अनेकदा समोसे गरम खाण्यालाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ते ताजेच खाल्ले जातात. या उलट बर्गर बनवताना अहवालात नमूद केल्याप्रमाणे जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात प्रीझरव्हेटिव्ह, अॅसिड रेग्युलेटर्स, फ्रोजन फॅट्स असणार्या पदार्थांचा वापर होतो. ताज्या पदार्थांमध्ये अशी कोणतीही रसायने नसतात. बर्गर अल्ट्रा प्रोसेस्ड फूड प्रकारात मोडत असल्याने त्यात या घटकांचे प्रमाण जास्त असते. बॉडी बर्डन नावाने सीएसईने हा अहवाल सादर केला.