सलमानला पाच वर्षांचा तुरुंगवास : काळवीट शिकार प्रकरण

गुरूवार, 5 एप्रिल 2018 (14:54 IST)
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सकाळी दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाने सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीची असल्याने सलमानला जामीनही मिळणार नाही.
 
दरम्यान, या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, निलीमा आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला.
 
नेमकं काय आहे काळवीट शिकार प्रकरण 
 
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता सलमान खान जोधपूरला आला होता. त्यावेळी काळवीटाची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शिकार झाली तेव्हा सलमानच्या गाडीत अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खानही होता. शिकार करण्यासाठी त्यांनीच सलमानला भरीस घातल्याचा आरोप होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती