२० लाख दिले नाहीत, तर बॉम्बनं उडवून देऊ, साईसंस्थान विश्वस्थाना धमकी

शनिवार, 11 मार्च 2017 (16:34 IST)
साईसंस्थानचे विश्वस्त सचिन तांबे आणि मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांना वीस लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या दोघांनाही एक निनावी पत्र धाडण्यात आलं आहे. पोस्टानं आलेल्या निनावी पत्रात ही धमकी देण्यात आली आहे. वीस लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली असून ‘जर वीस लाख दिले नाहीत, तर बॉम्बनं उडवून देऊ.’ असंही या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, या पत्रामुळे शिर्डीत चांगलीच खळबळ पसरली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा