एका रिपोर्टप्रमाणे साईबाबांची चंद्रात प्रतिमा असलेला फोटो क्षणार्धात व्हॉट्सअॅपवर पसरला. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातही अशीच व्हॉट्सअॅप अफवा पसरली होती. मात्र व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये फिरत असलेला तो फोटो बनावट असल्याचं सिद्ध झालं होतं. तो फोटो फॉटोशॉप करून पसरवण्यात आला होता.
शिवाय खऱ्या भक्तालाच हे साईबाबा दिसतील, आणि ज्यांना दिसत नाहीये ते श्रापित असावे असंही त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून, कुणी गच्चीवरून तर कुणी दुर्बिण घेऊन चंद्राला न्याहाळताना दिसले.