या सुनावणीत राहुल यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान, मागील सुनावणीत कोर्टाने त्यांना जामीन दिला होता. दरम्यान कोर्टाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. गर्दीमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी राहुल गांधी यांनी आरएसएसविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून त्यांच्या विरोधात आरएसएसने अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला होता.