सापाने गेल्या दोन वर्षात चार वेळा आपल्या मुलाला दंश केला असल्याचा दावा या शेतकर्याने केला असून जो कोणी सापाला पकडून आणेल त्याला पाच हजार रूपयांची रोख रक्कम दिली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे. सापामुळे त्रस्त्र झालेल्या 45 वर्षीय शेतकरी सुरेंद्र कुमार यांनी आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी घराबाहेर दोन सुरक्षारक्षकही उभे केले आहेत. मुलाची सुरक्षा करणेही एकमेव जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. फक्त सुरेंद्र कुमारच नाही तर गावातील लोकांचेही म्हणणे आहे की साप सूड घेण्याच्या उद्देशाने फक्त सुरेंद्र कुमार यांच्या मुलाला वारंवार दंश करत आहे.