मंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या घरगुती मदतनीसच्या घरातून 20 कोटी रुपयांची रक्कम जप्त

सोमवार, 6 मे 2024 (18:41 IST)
अमलबजावणी संचालनालयाने झारखंडची राजधानी रांची मध्ये विविध भागात छापे टाकले. वीरेंद्र राम प्रकरणात झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलंम यांचे स्वीय सचिव संजीवलाल यांच्या घरगुती मदतनीसच्या घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. संजीवलाल यांच्या घरी नोट मोजण्याचे यंत्र आणले गेले असून आत्ता पर्यंत 20 कोटी हुन अधिक पैसे मोजले गेले आहे. नोटांची मोजणी अद्याप सुरु आहे. 
नोटांच्या मोजणीत 500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहे. त्यांच्या घरात स्टीलच्या पेट्या आणण्यात आल्या आहे. 

गेल्यावर्षी फेब्रुवारी मध्ये ईडीने झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र के राम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रदीर्घ चौकशी नंतर अटक करण्यात आली होती. चौकशीत त्यांनी ईडीसमोर अनेक बड्या व्यक्तींसोबतचे संबंधही उघड केले. मिळालेल्या माहितीनुसार, रामच्या जागेवर 150 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. याशिवाय दोन कोटींचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. ईडीने वीरेंद्र रामकडून एक लॅपटॉप आणि काही पेनड्राइव्हही जप्त केले आहेत. 

ईडीने गेल्या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या 24 ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरु केली. 
राम आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांच्या तपासणीत त्यांच्या कायदेशीर पेक्षा जास्त रक्कम असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले होते

राम यांनी आपल्या पत्नी, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने जंगम मालमत्ता जमा केली. सप्टेंबर मध्ये 2020 मध्ये वीरेंद्र राम यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तक्रार दाखल केली होती. 
 
Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती