शुक्रवारी कुटुंबीयांनी बूंदी जिल्हा बाल कल्याण समिति सोबत संपर्क साधला.त्यानंतर बूंदी जिल्हा बाल कल्याण समिति अध्यक्ष यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत आणि भारतीय न्याय संहिता संबंधित कलाम अंतर्गत प्रकरण नोंदवून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडिताचे कुटुंब बुंदी मध्ये भाड्याने राहते. घर मालकाच्या मुलाने संधी साधून या सात वर्षाच्या मुलीला आपल्या वासनेचे शिकार बनवले. त्यानंतर हा आरोपी फरार झाला असून त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष टीम तयार केली आहे.