भीमाला 2018 -2019 साली राजस्थानच्या पुष्कर जत्रेतून आणले होते असे त्याचे मालक अरविंद सांगतात. भीमा आतापर्यंत बालोत्रा, नागौर,डेहराडूनसह अनेक जत्रेत गेला असून त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्याचे वीर्य पशु पालकांना विकले जाते. त्याच्या वीर्याला खूप मागणी असून त्याचे 0.25 एम एल वीर्य 500 रुपयाला विकले जाते.
भीमा 14 फूट लांब असून 6 फूट उंच आहे. भीमावर त्याचे मालक महिन्याचे 2 लाख रुपये खर्च करतात. त्याचा आहार देखील त्याच्या आकाराप्रमाणे मोठा आहे. भीमा दररोज एक किलो तूप, 25 लिटर दूध पितो आणि 1 किलो काजू बदाम खातो.