भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिस खाण्यायोग्य नाही

शनिवार, 22 जुलै 2017 (09:37 IST)

रेल्वे स्टेशनांवर खाण्या-पिण्याचे जे पदार्थ बनवण्यात येतात, ते खाण्यायोग्य नाहीत. ट्रेन आणि स्टेशनांवर बनवण्यात येणारे खाद्यपदार्थ हे प्रदूषित असतात असे सांगत भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसची सीएजीच्या रिपोर्टमुळे पोलखोल झाली आहे.  

पॅकबंद खाद्यपदार्थ आणि बाटलीबंद पाणी नियतकालीन वेळेनंतर विकण्यात येत असल्याचं धक्कादायक वास्तव रिपोर्टमधून समोर आलं आहे. तसेच अनधिकृत कंपन्यांच्या पाण्याच्या बोटलही विकल्या जात आहेत. रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये अजिबात साफसफाई नसते. ट्रेनमध्ये विकण्यात येणा-या अन्न पदार्थांचं बिल दिलं जात नाही. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबतही प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. सीएजी आणि रेल्वेच्या संयुक्त टीमनं 74 स्टेशन्स आणि 80 ट्रेनची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान ट्रेन आणि स्टेशनांवर साफसफाईची बोंबाबोंब असल्याचं निदर्शनास आलं आहे.   

वेबदुनिया वर वाचा