टॉयलेटमध्ये सॅनिटरी पॅड सोडला तर तपासणीसाठी मुलींचे कपडे काढवले

पंजाबच्या बठिंडा येथील एका खाजगी युनिव्हर्सिटीच्या मुलींनी आपल्या हॉस्टल वॉर्डन विरोधात प्रदर्शन केले. त्यांचा आरोप आहे की टॉयलेटमध्ये सॅनिटरी पॅड कोणी फेकला हे तपासण्यासाठी त्यांनी जवळपास डझनभर मुलींचे कपडे काढवले. हे प्रकरण वाढलं त्यामुळे विश्वविद्यालय प्रशासनाने दोन महिला वार्डन काढले.
 
तलवंडी साबो स्थित एका युनिव्हर्सिटीच्या सुमारे 600-700 मुलींना या घटना विरोधात प्रदर्शन केले. प्रशासन त्यांना थांबवू शकला नाही आणि ड्यूटीत लापरवाही केल्यामुळे दोन महिला सुरक्षा कर्मचार्‍यांना नोकरीतून डिसमिस केले.
 
सुरुवातीला युनिव्हर्सिटी प्रशासनाने हे प्रकरण इतकं मोठे नाही असे म्हटले परंतू मुलींनी विरोध केल्यावर कोणत्याही प्रकाराची कायदेशीर कारवाई न करता कर्मचार्‍यांना नोकरीतून काढले.
 
विद्यार्थ्यांनी कर्मचार्‍यांविरोधात उशिरा कारवाई केल्याचा देखील आरोप केला आहे. मुलींप्रमाणे परिसरातील वातावरण योग्य नाही आणि येथे पुरुष विद्यार्थ्यांशी बोलण्यावर देखील बंदी आहे.
 
विरोध प्रदर्शनात सामील मुलींप्रमाणे त्या वॉर्डन आणि प्रशासन विरोधात मजबुतीने उभ्या आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे. तलवंडी साबो येथील युनिव्हर्सिटीमध्ये दोन दिवसांपूर्वी देखील टॉयलेटमध्ये वापरलेले सॅनिटरी पॅड सापडले होते.
 
हॉस्टल वॉर्डन्स ने दोन महिला सुरक्षा कर्मचार्‍यांना मदतीने 12 मुलींचे कपडे काढवले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती