काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जनपासूनच आरक्षित आहे. राहुल गांधींनी लग्न न केल्यामुळेच प्रियंका गांधी यांना राजकारणात सक्रिय व्हावे लागले आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा एकदा गांधी घराण्यावर निशाणा साधला आहे.
गुजरातमधल्या गोध्रा येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करू शकतो का?, असा प्रश्र्नही शहांनी उपस्थित केला आहे. शहा म्हणाले- राहुल गांधींचे लग्न झालेले नाही. त्यामुळे आता प्रियंका गांधी राजकारणात आल्या आहेत.
तसेच ते म्हणाले, भाजपध्ये एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. परंतु काँग्रेसमध्ये तसे कधीही होणार नाही. शहा पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, मी भाजपचा एक बूथ कार्यकर्ता होतो. आता पक्षाचा अध्यक्ष झालो आहे.
एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला आहे.
काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता पंतप्रधान बनण्याचा विचार करू शकतो काय?, काँग्रेस पक्षात पंतप्रधानपदाची जागा तर जन्मताच आरक्षित होते.