मिळालेल्या माहितीनुसार वायनाडमधील काँग्रेस लोकसभा खासदार म्हणाल्या की, विरोधी पक्षाच्या सदस्यांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भाजप बळाचा वापर करू शकते. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, “भाजप लाठ्या घेऊन संसदेत येऊ शकते, आम्हाला संसदेत प्रवेश करण्यापासून रोखू शकते, धक्काबुक्की करू शकते. पण मुद्दा बाबासाहेबांच्या अपमानाचा आहे. बाबासाहेबांचा अपमान करून करोडो देशवासीयांच्या भावना दुखावल्याबद्दल भाजपला माफी मागावी लागेल. आदल्या दिवशी झालेल्या धक्कबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले होते. वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपवर वारंवार डॉ. आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला तसेच भाजपने देशातील करोडो दलित आणि वंचितांच्या भावनांचा अपमान केला आहे. भाजपने देशाची माफी मागावी असे देखील प्रियंका गांधी म्हणाल्या.