New Delhi News: देशाच्या भविष्यासाठी तरुणांना तयार करण्यात शिक्षण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते आणि सरकार तिचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने काम करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.
" पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या शिक्षण व्यवस्थेचीही यामध्ये मोठी भूमिका आहे, म्हणून आपण २१ व्या शतकाच्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करत आहोत.