यात १३ ऑगस्ट ला विभाने मुलीला जन्म दिला. त्यावेळी दोघांनी मिळून मुलीचे नामकरण करण्यासाठी मोदींना पत्र लिहण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या ‘बेटी बचाव’ अभियानामुळे आणि ऑलिम्पिकमध्ये भारताच्या दोन मुलींनी जिंकलेल्या पदकांमुळे प्रेरणा मिळाल्याचे पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात म्हटले. मग हे पत्र स्पीड पोस्टाने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर २० ऑगस्टला भरत यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भरत आणि विभाशी तब्बल अडीच मिनिटे संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलगी झाल्याबद्दल आमचे अभिनंदन केले. आणि मुलीचे नाव ‘वैभवी’ ठेवा, असे सांगितले. पुढे ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली तेव्हा त्यांनी ती हसण्यावारी नेली. त्यामुळे भरतने २२ ऑगस्टला पंतप्रधान कार्यालयात दूरध्वनी करून पंतप्रधानांनी पत्राला दिलेल्या प्रतिसादाची प्रत देण्याची विनंती केली. त्यानंतर स्पीड-पोस्टद्वारे ही प्रत आल्यावर हे दोघे आता ‘सेलिब्रिटी कपल’ बनले आहेत.