नरेंद्र मोदी यांनी बुधवार, 5 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिपरिषदेसह राजीनामा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा स्वीकारला आहे. त्यांनी नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाला नवीन सरकार येईपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली आहे.
या तारखेला मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.