बाबा रामदेव यांच्यावर 11 लाखाचे दंड

डेहराडून- हरिद्वारच्या एक स्थानिक कोर्टाने बाब रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदच्या पाच उत्पादन युनिटवर त्यांच्या उत्पादाचे चुकीचे आणि भ्रामक जाहिरात प्रकरणी 11 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने 1 महिन्याच्या आत ही राशी जमा करवण्याचे निर्देश दिले आहे.
खाद्य सुरक्षा अधिकारी योगेंद्र पांडे यांनी ऑगस्ट 2012 मध्ये दिव्य योग मंदिरच्या पतंजली स्टोअरवर छापा मारून कच्ची घानी मोहरीचे तेल, मीठ, बेसन, मध आणि अननस जेमचे चार-चार नमुने घेतले होते. प्रयोगशाळा परीक्षणात नमुने फेल झाले होते.
 
कोर्टाने म्हटले की पतंजली आयुर्वेद चुकीच्या प्रचारासाठी दोषी आढळले कारण कंपनीने दर्शवले की त्याचे उत्पाद त्यांच्याच युनिटमध्ये तयार होतात जेव्हा की त्यांचा निर्माण इतर कुठेतरी होत होता.

वेबदुनिया वर वाचा