सीए परीक्षेचा निकाल : राज परेश शेठ देशात पहिला

मंगळवार, 18 जुलै 2017 (17:04 IST)
द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानेद्वारे मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत डोंबिविलीच्या राज परेश शेठ या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. राज शेठला सीएच्या परीक्षेत 78.75 टक्के गुण मिळाले आहेत. 800 मार्कांच्या असलेल्या परीक्षेत राजने 630 गुण मिळविले आहेत.  78.75 टक्के मिळवत सीएच्या परीक्षेत राज देशात पहिला आला आहे. 
 
मे 2017 च्या सीएच्या परीक्षेत अगस्थीस्वरण एस या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अगस्थीस्वरणला 800 पैकी 602 गुण मिळाले आहेत. सीएच्या परीक्षेत 75.25 टक्के मिळवत अगस्थीस्वरण देशात दुसरा आला आहे. तर मुंबईच्या कृष्णा पवन गुप्ता हा विद्यार्थी देशात तिसरा आला आहे. कृष्णाला 75.13 टक्के गुण मिळाले असून 601 इतकी त्याच्या मार्कांची टोटल आहे. विशेष म्हणजे अगस्थीस्वरण आणि कृष्णा या दोघांच्या मार्कांच्या टक्केवारीत फक्त 0.12 टक्क्यांचा फरक आहे.

वेबदुनिया वर वाचा