आधार कार्ड नसल्यास पॅन कार्डने रिटर्न भरा

शुक्रवार, 9 जून 2017 (22:28 IST)

पॅन कार्ड आधारशी जोडण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आधार कार्ड नसल्यास पॅन कार्डचा वापर करुन इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल असेही यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच घटनापीठाचा निकाल येईपर्यंत आधार-पॅन जोडणीवरील स्थगिती कायम राहणार आहे. केंद्र सरकारने बोगस पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी आधार-पॅन जोडण्याचा कायदा अंमलात आणला होता. सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आधार कार्ड ऐच्छिक असल्याची भूमिका घेणारं सरकार अचानक एवढा मोठा निर्णय कसं घेऊ शकतं असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता. त्यावरील सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टानं आधार-पॅन जोडणीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा