जम्मू-काश्मीरमधील नौसेरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाले आहेत. भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, अद्यापही पाककडून थोड्या फार प्रमाणात गोळीबार सुरुच आहे. पाकिस्तानच्या या आगळीकीचं भारतीय लष्करही चोख उत्तर देत आहे. पाकिस्तानकडून दोन बॉम्बहल्ले करण्यात आले. यातील एका बॉम्ब नौसेरा सेक्टरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद हनीफ यांच्या घराजवळ पडला. ज्यामध्ये हनीफ आणि त्याची पत्नी जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथं त्याच्या पत्नीला मृत घोषित करण्यात आलं.