अभिनेते ओम पुरी यांच्या पोस्टमार्टम अहवालानुसार पुरी यांच्या डोक्याला जखम झाली असून त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने नव्हे, तर घातपाताने झाल्याची शक्यता वाढली आहे. अभिनेते ओम पुरी यांचे 6 जानेवारीला मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुरी यांचे निधन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.