Odisha : ओडिशामध्ये टाटा स्टील प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात 19 जण जखमी

मंगळवार, 13 जून 2023 (16:57 IST)
ढेंकनाल येथील टाटा स्टील प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात 19 जखमी: ओडिशातील रेल्वे अपघातानंतर आता आणखी एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी आहे. ओडिशातील ढेंकनाल येथील टाटा स्टीलच्या मेरामंडली प्लांटमध्ये अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 19 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
एएनआय न्यूज एजन्सीनुसार, टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे की, “ओडिशातील ढेंकनाल येथील टाटा स्टील मेरामंडली वर्क्समध्ये वाफेच्या गळतीमुळे BFPP2 पॉवर प्लांटमध्ये झालेल्या दुर्घटनेच्या वृत्ताने आम्हाला दुःख झाले आहे.
 
हा अपघात आज दुपारी 1:00 वाजता (IST) झाला. तपासणीचे काम सुरू असताना आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या काही लोकांना बाधा झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर तत्काळ सर्व आपत्कालीन प्रोटोकॉल सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आणि परिसराची नाकाबंदी करण्यात आली.
ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील मेरामुंडली येथील टाटा स्टीलच्या हॉट रोल्ड कॉइल कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. कारखान्याच्या भट्टीत हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 19 जण जखमी झाले आहेत. यातील काही लोक गंभीर जखमी झाले असून, त्यांना कटक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited by - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती