आता पासपोर्ट बनवण्यासाठी बर्थ सर्टिफिकेट गरजेचे नाही

सोमवार, 24 जुलै 2017 (16:57 IST)
भारतीयांसाठी आता पासपोर्ट बनवणे फारच सोपे झाले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की आता पासपोर्ट बनवण्यासाठी बर्थ सर्टिफिकेट (जन्मदाखल्या)ची गरज नाही आहे.  आधार आणि PANचा वापर डेट ऑफ बर्थची खात्री करून देईल मात्र पासपोर्ट नियम १९८० नुसार २६ जानेवारी १९८९ नंतर जन्माला आलेल्या लोकांना जन्म दाखला म्हणून मान्यता प्राप्त शैक्षणिक बोर्डाचं मॅट्र्रीक्युलेशन सट्रिफिकेट, पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, किंवा एलआयसी पॉलिसी बॉन्डचा प्रुफ देखील वापरता येणार आहे.
 
पासपोर्ट अर्जावर 10% ची सूट
8 वर्षापेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पासपोर्ट अर्जावर 10% सूट देण्यात येईल. तसेच ऑनलाइन अर्ज करणार्‍यांना फक्त एक अभिभावकाचे नाव दिले तरी चालेल ज्याने सिंगल पैरेंट्सला मदत मिळेल.  
 
याशिवाय सरकारी कर्मचारी आपला सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्ड या कागदपत्रांचा देखील रेकॉर्ड म्हणून वापर करू शकतात. संसदेत एका प्रश्नाचं उत्तर देतांना परराष्ट्र राज्य मंत्री व्ही के सिंह यांनी सांगितलं, याचा उद्देश लाखो लोकांना सोयीस्करपणे पासपोर्ट उपलब्ध करून देण्याचा आहे.

वेबदुनिया वर वाचा