मुस्लिम महिले बदलले नाव, नरेंद्र मोदी ऐवजी आता मोहम्मद अल्ताफ मोदी

उत्तर प्रदेशाच्या गोंडा जिल्ह्यात लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेल्या एका मुलाचे नाव आता मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे ठेवले गेले आहे. जन्म तारखेबद्दल देखील नवीन वाद सुरू आहे. तिला समाजाची भीती दाखवण्यात आली असा दावा मुलाच्या आईने केला आहे. नातेवाइकांनी हकीका आणि खतना होणार नाही अशी भीती दाखवली. 
 
सामाजिक बहिष्कार केल्या जाण्याची गोष्ट समोर आली. म्हणून तिने नरेंद्र मोदी ऐवजी मोहम्मद अल्ताफ आलम मोदी असे नाव दिले.
 
वजीरगंजच्या परसापुर महरौर गावातील रहिवासी मोहम्मद इदरीस यांची सून मेनाज यांनी 23 मे रोजी मुलाला जन्म दिला. त्याच दिवशी मुलाचे वडील मुश्ताक अहमद यांनी दुबईहून फोन करून विचारले की काय नरेंद्र मोदी आले आहेत? मेनाजने हो म्हणत मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांनी सुनेच्या या निर्णयाचे स्वागत केले. मुस्लिम कुटुंबाने मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवून जगभरात चर्चा मिळवली होती.
 
आता मात्र जन्म तारखेवर देखील वाद सुरू आहे. सीएचसी वजीरगंज येथील डॉक्टर भावना यांच्याप्रमाणे मुलाचा जन्म 12 मे रोजी 12 वाजून 59 मिनिटाला वजीरगंज येथील सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात झाला होता. मेनाज बेगमला हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा डॉक्टर भावना स्वत: 12 मे रोजी ड्यूटीवर होती पर थीं. हे पूर्ण स्वास्थ्य केंद्रच्या कागदपत्रांमध्ये नोंदलेले आहे. 
 
केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी 23 मे जन्म तारीख सांगून मुलाचं नाव नरेंद्र मोदी ठेवण्यात आले. महिला आता समाजाची भीती दाखवत आहे. इकडे मेनाज यांनी म्हटले की ती मुलाचे नाव अल्ताफ आलम मोदी ठेवेल. लोकांचे बोलणे खाऊन तिला हा निर्णय घ्यावा लागला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती