जुन्या नोटा वापरण्याला 24 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (14:13 IST)
५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत सोमवारी मध्यरात्री संपणार होती. पण चलन तुटवडयामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने जुन्या नोटा वापरण्याची मुदत आणखी १० दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे रुग्णालय, पेट्रोल पंप, टोलनाके आणि रेल्वे स्टेशनवर २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा वापरता येतील. रविवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत नोटबंदीच्या निर्णयाचा आढावा घेतला त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.  

वेबदुनिया वर वाचा