बेहिशेबी संपत्तीवर कारवाई करण्याची हीच खरी वेळ: नितीश कुमार
बेहिशेबी संपत्तीवर कारवाई करण्याची हीच खरी वेळ आहे असे म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.
नोटाबंदीनंतर सरकारने बेहिशेबी मालमत्तांवर कारवाई आणि दारुबंदीसाठी ठोस पाऊल उचलावे, अशी अपेक्षा नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. बेहिशेबी मालमत्ता आणि मद्य हे काळ्या पैशांचे प्रमुख स्त्रोत आहेत असेही ते म्हणाले आहेत.