उत्तरकाशी मध्ये हेलिकॉप्टर कोसळले

गुरूवार, 8 मे 2025 (10:39 IST)
उत्तरकाशीमध्ये अपघात झालेले हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्षिलला जात होते. याच दरम्यान वाटेत हा अपघात झाला. 
ALSO READ: ऑपरेशन सिंदूरनंतर नागपूर शहर हाय अलर्टवर, या संवेदनशील भागांवर पोलिस ठेवणार करडी नजर
मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी या हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते असे सांगण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्सिलला निघाले होते. या अपघातामागील कारण सध्या तपासले जात आहे.
ALSO READ: लातूर जिल्ह्यात 'पाकिस्तानी' म्हणत मारहाण केल्याने नैराश्यात एकाची आत्महत्या
या घटनेची माहिती मिळताच उत्तरकाशी जिल्ह्याचे डीएम घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत जखमी झालेल्या दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचीही ओळख पटवली जात आहे.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: मुंबई: पावसामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती