वायुसेना दिनी नवा कॉम्बॅट युनिफॉर्म लॉन्च, वायुसेना प्रमुखांनी केली मोठी घोषणा

शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (12:08 IST)
भारतीय वायुसेनेच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी सकाळी चंदीगड येथील वायुसेना स्थानकावर एका औपचारिक परेडचे आयोजन करण्यात आले होते. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी परेडचे निरीक्षण केले, त्यानंतर मार्चपास्ट करण्यात आला. यावेळी हवाई दलाचे प्रमुख चौधरी यांनी हवाई दलात वेपन सिस्टीम विंग स्थापन करण्याची घोषणाही केली. आज हवाई दलाला एक नवीन कॉम्बॅट ड्रेस मिळाला आहे.
 
 कार्यक्रमात चौधरी म्हणाले की, केंद्र सरकारने भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांसाठी वेपन सिस्टीम विंग स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर प्रथमच हवाई दलात नवीन ऑपरेशनल विंग तयार करण्यात येत आहे.
 
एअर चीफ मार्शल यांनी दावा केला की या शाखेच्या निर्मितीमुळे विमान प्रशिक्षणाच्या खर्चात कपात करून सरकारला 3,400 कोटी रुपयांहून अधिक बचत करण्यास मदत होईल.
 
एअर-ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, वेस्टर्न एअर कमांड, एअर मार्शल श्रीकुमार प्रभाकरन आणि इतर अनेक वरिष्ठ हवाई दल अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
 
हवाईदल प्रमुख घटनास्थळी पोहोचल्यावर विंग कमांडर विशाल जैन यांच्या नेतृत्वाखाली तीन Mi-17V5 हेलिकॉप्टरने फ्लाय-पास्ट करताना भारतीय ध्वज प्रदर्शित केला. सुमारे 80 लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर सुखना तलाव संकुलात हवाई दल दिनाच्या फ्लाय-पास्टमध्ये सहभागी होतील.
 
ही पहिलीच वेळ आहे की भारतीय वायुसेना दिल्ली-NCR (नॅशनल कॅपिटल रिजन) च्या बाहेर वार्षिक वायुसेना दिवस परेड आणि फ्लाय-पास्ट आयोजित करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुखना तलाव संकुलातील फ्लाय-पास्टमध्ये सहभागी होतील.

Edited by : Smita Joshi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती