मुलायम सिंह यांचे लहान भाऊ आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव हे नवीन पक्षाची स्थापन करणार आहेत. विशेष म्हणजे शिवपाल यांच्या नव्या पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह असतील. ‘समाजवादी सेक्युलर मोर्चा’ असे शिवपाल यांच्या नव्या पक्षाचं नाव असेल. या नव्या पक्षाचे नेतृत्त्व मुलायम सिंह यादव करणार असून, ते सध्या अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात आहेत. नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत माहिती देताना शिवपाल यादव म्हणाले, “नेताजींना (मुलायम सिंह) त्यांचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी आणि समाजवाद्यांना एकत्र आणण्यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल.”