पांडे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2012 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. वैवाहिक जीवनातील निराशेपोटी त्यांनी जीवनयात्रा संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यांना एक कन्याही असल्याचे समजते. पांडे यांचे कुटूंबीय गुवाहाटीमध्ये राहतात. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पांडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. पांडे हे सक्षम प्रशासक आणि संवेदनशील अधिकारी होते, असे ट्विट त्यांनी केले.