लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सर्वाधिक मुख्यमंत्री काँग्रेसचे

शनिवार, 25 मे 2019 (10:13 IST)
या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी लातेसमोर अनेक दिग्गज टिकू शकले नाहीत. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे दिग्विजय सिंह, शीला दीक्षित आणि भुपेंद्र सिंह हुड्डासारखे दिग्गज यावेळी लोकसभा निवडणुकीत जबरदस्त पराभूत झालेले आहेत. पराभूत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक हे काँग्रेसचे मुख्यमंत्री असून, यामध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (भोपाळ, मध्य प्रदेश), शीला दीक्षित (दिल्ली), भूपेंद्र सिंह हुड्डा (सोनीपत, हरयाणा), हरीश रावत (नैनीताल, उत्तराखंड), अशोक चव्हाण (नांदेड, महाराष्ट्र), सुशील कुमार शिंदे (सोलापूर, महाराष्ट्र), मुकुल संगमा (तुरा, मेघालय), नवाम टुकी (अरुणाचल प्रदेश), वीरप्पा मोईली (चिकबल्लूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे.
 
सोबतच  काही बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांचाही यामध्ये पराभव झाला असून, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अनंतनाग मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी देवगौडा टुम्कुर आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचाही यंदाच्या लोकसभेत पराभव झालेला आहे. त्यामुळे आता जनता यांना कंटाळली आहे असे चित्र तरी सध्या दिसते आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती