विशाखापट्टणम बंदरात भीषण आगीत 25 हुन अधिक बोटी जळाल्या

सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (09:12 IST)
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. ही आग किती भीषण होती, याचा अंदाज या आगीत पाण्यात उभ्या असलेल्या 25 बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात कराव्या लागल्या. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 
 
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील बंदरात रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. ही आग किती भीषण होती, याचा अंदाज या आगीत पाण्यात उभ्या असलेल्या 25 बोटी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तैनात कराव्या लागल्या. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आगीचे कारण सिलिंडरचे स्फोट आहे.

बोटींवर ठेवलेल्या गॅस सिलिंडर मध्ये मोठा स्फोट झाल्यावर आग लागली. या आगीत 25 हुन अधिक बोटी जळून खाक झाल्या आहे. हा सिलिंडर स्फोट कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चारहून अधिक अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

या आगीमुळे सुमारे 40 बोटींचे नुकसान झाल्याचे मच्छिमारांनी सांगितले. प्रत्येक बोटीची किंमत किमान 40 लाख रुपये होती.आग लागल्यानंतर बंदरावर उपस्थित असलेल्या स्थानिक मच्छीमारांनी तातडीने स्थानिक पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. मच्छिमारांनी सांगितले की, आग एका बोटीतून लागली, ती काही वेळातच इतर बोटींमध्ये पसरली. आग लागलेल्या बोटीच्या आजूबाजूला इतर बोटी नांगरल्या गेल्याने आग वेगाने पसरली. 































 Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती