नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मोदी मंत्रिमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामुळे लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी झालेल्या विशेष बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना 78दिवसांचा बोनस देण्याची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 2029 कोटी रुपयांची उत्पादकता-लिंक्ड बोनस योजना मंजूर केली आहे.
तसेच या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरी आणि उत्पादकतेच्या आधारावर हा बोनस दिला जाईल. सुमारे 12 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तसेच नवरात्रीसारख्या सणाच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी हा बोनस महत्त्वाची आर्थिक मदत ठरेल. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहेच, शिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांप्रती सरकारची बांधिलकीही यातून दिसून येते. यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांना त्यांच्या कामात अधिक प्रेरणा मिळेल.