UP: रिचार्ज शॉपवर 50 आणि 500 रुपयांमध्ये विकण्यात येत मुलींचे नंबर

शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017 (12:03 IST)
साधारण लुक असणार्‍या मुलींचे फोन नंबर 50 रुपयात आणि  सुंदर मुलींचे फोन नंबर 500 रुपयांमध्ये रिचार्जच्या दुकानांवर विकण्यात येत आहे. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की युपीत मोबाइल रिचार्जच्या दुकानांमध्ये बेकायदेशीर व्यवसाय चालत आहे.    
 
यानंतर सुरू होते असली कहाणी. मुलं या नंबरांवर फोन लावतात आणि जर मुलीने फोन उचलला तर तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतात. जर मुलगी बोलण्यास नकार देते तर तिच्यासोबत अभद्र गोष्टी करू लागतात. या रॅकेटचा भंडाफोड़ तेव्हा उघडकीस आला जेव्हा महिला हेल्प लाइन 1090 वर या प्रकाराच्या तक्रारी जास्त येऊ लागल्या.  
 
तुम्हाला सांगायचे म्हणजे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महिलांसोबत उत्पीडनाची तक्रार नोंदवण्यासाठी 1090 हेल्पलाइन सुरू केली होती. या नंबरावर मागील 4 वर्षांमध्ये 6 लाखापेक्षा जास्त उत्पीडनाची तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत. यात 90 टक्के तक्रार महिलांसोबत फोनवर उत्पीडनाच्या होत्या.  
 
महिलांजवळ जे फोन कॉल्स येतात त्यात जास्त करून पुरुष आम्हाला तुमच्याशी मैत्री करायची आहे, असे बोलून गोष्टी सुरू करतात. हे नंबर त्यांना मोबाइल फोनच्या रिचार्ज शॉपहून मिळाले होते. तक्रारीनंतर जेव्हा पोलिस त्या नंबरांवर कॉल करतात तर लोक बहाणा बनवून देतात की त्यांचा मोबाइल चार्जिंगवर ठेवला होता त्यांना माहीत नाही की कोणी त्यांच्या नंबरावर कॉल केला होता.   

वेबदुनिया वर वाचा