PM मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक ,पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उडताच काँग्रेस कार्यकर्त्याने उडवले काळे फुगे

सोमवार, 4 जुलै 2022 (19:23 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यात विजयवाडा येथे ही घटना घडली. येथे पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरच्या टेकऑफवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फुगे सोडले. एसपी सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले की, ही घटना गन्नावरम विमानतळावर घडली. याप्रकरणी काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोडलेले काळे फुगे पीएम मोदींच्या हेलिकॉप्टरच्या अगदी जवळ असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. 
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी फुगे उडवत ‘नरेंद्र मोदी गो बॅक’च्या घोषणा दिल्या. या पूर्वी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांच्या सुरक्षेतील चुकीचे मोठे प्रकरण समोर आले होते.
 
स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125व्या जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आंध्र प्रदेशात पोहोचले होते. येथे पंतप्रधानांनी त्यांच्या ब्राँझच्या पुतळ्याचे अनावरणही केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, 'आंध्रच्या या भूमीच्या महान आदिवासी परंपरेला, या परंपरेतून जन्मलेल्या सर्व महान क्रांतिकारकांना आणि त्यागकर्त्यांना मी नमन करतो. सीताराम राजू गरू यांची 125 वी जयंती आणि रामपा क्रांतीची 100 वी जयंती वर्षभर साजरी केली जाणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती