लग्न करणार्‍या दोघात तिसर्‍याचा हस्तक्षेप नको

मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (11:45 IST)
वैवाहिक संबंधात दखल देणार्‍या खाप पंचायतीला सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त चपराक लगावली आहे. जर दोन वयस्क (सज्ञान) व्यक्ती लग्न करत असतील तर त्यात तिसर्‍याने दखल देण्याची अवश्यकता नाही. अगदी कुटुंबातील लोक असो वा समाजातील लोक, कुणीही दोन वयस्कांच्या लग्नात हस्तक्षेप करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. दरम्यान, खाप पंचायतीसंबंधी या याचिकेवर येत्या 16 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 'व्यक्तिगतरीत्या, सामूहिकरीत्या किंवा संघटना म्हणून कोणीही कुणाच्या विवाहामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. जर दोन सज्ञान व्यक्ती लग्न करत असतील तर त्यांना जबरदस्तीने वेगळे करणे चुकीचे ठरेल,' असे सांगतानाच 'आम्ही इथे काही कथा लिहायलाबसलो नाही आणि लग्न कशा पद्धतीने होतात हेही सांगायला बसलो नाही' असे न्यायालयाने स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती