याबाबत अधिक माहिती अशी की, क्रिकेट खेळता-खेळता एका 22 वर्षीय तरुणाच्या अचानक छातीत दुखू लागले, बॉलिंग करत असताना तो जमिनीवर कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इंदलसिंग जाधव (वय 22) असं मृत तरुणाचं नाव आहे.
इंदलसिंग हा 22 वर्षीय तरुण बरखड तांडा गाव संघाकडून खेळत होता. प्रथम फलंदाजी करताना इंदलसिंग याने 70 धावा कुटल्या. जेव्हा त्याची गोलंदाजी करण्याची वेळ आली, तेव्हा इंदलसिंगने शानदार गोलंदाजी केली, पण गोलंदाजी करताना त्याच्या छातीत दुखू लागले.
इतर मित्रांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला. मात्र, ओव्हर पूर्ण करून बाहेर जातो, असं इंदलसिंगने सांगितलं. दरम्यान, गोलंदाजी करता-करता तो जमिनीवर कोसळला. मैदानावर उपस्थित असलेल्या इतर तरुणांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.