पश्चिम बंगाल, मिझोराम ने लॉकडाऊन वाढवला

सोमवार, 8 जून 2020 (21:48 IST)
देशात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव न झालेल्या राज्यांमध्येही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि मिझोराम या दोन राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
लॉकडाउन शिथिल केला असला, तरी देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या चिंता वाढवू लागली आहे. अनेक राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. स्थलांतरित मजूर आणि केंद्र सरकारनं प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर अनेक राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मिझोराममध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं राज्य सरकारनं कडक लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. राज्य सरकारनं दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवला असून, क्वारंटाइनचा अवधी २१ दिवस केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती