उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची मतमोजणी सुरू आहे. आता नजर टाकू या काही विशेष बिंदूवर:
डेहराडून : हरिश रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल के. के. पॉल यांच्याकडे सुपूर्द केला
- आम्ही नम्रपणे विजय स्वीकारला आहे, विकासासाठी अथक प्रयत्न करू- अनंत कुमार, केंद्रीय मंत्री
- मणिपूर विधानसभा निवडणूक अंतिम निकाल : भाजप २१, काँग्रेस २८, एलजीपी १, एनपीएफ ४, एनपीपी ४, अन्य २
- इव्हीएम यंत्रासंदर्भातल्या मायावतींच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी - लालू प्रसाद यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री
- गोवा निवडणूक निकाल- काँग्रेस 17, भाजपा 13, एनसीपी 1, एमजीपी 3, जीएफपी 3, अपक्ष 3