Bank Holidays: ऑक्टोबरमध्ये भरपूर सुट्ट्या, गांधी जयंती ते दसरा, बँका कधी बंद राहतील ते पहा

शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (17:21 IST)
List of holidays in October 2023 सप्टेंबर महिना संपत आला आहे. 2 दिवसांनी नवीन महिना सुरू होईल. ऑक्टोबरमध्ये अनेक सणांमुळे भरपूर सुट्ट्या असतात. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात बँकांमध्ये केवळ15 दिवसच कामकाज होणार आहे. म्हणजे 15 दिवस बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे पुढच्या महिन्यात बँकेत जाण्याचा तुमचाही विचार असेल तर सुट्टीची यादी पाहूनच बँकेत जा. बँकांना कोणत्या दिवशी सुट्या असतील याची माहिती रिझर्व्ह बँक देते. रिझर्व्ह बँक प्रत्येक कॅलेंडर वर्षासाठी सुट्टीची यादी तयार करते.
   
   आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीत यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त संबंधित राज्यांमध्येच बंद राहतील. त्यामुळे पंजाबमधील बँकांना कोणत्याही दिवशी सुट्टी असेल, तर महाराष्ट्रातील बँकाही त्या दिवशी बंद राहतील, हे गरजेच नाही.
  
आरबीआयने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीत यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त संबंधित राज्यांमध्येच बंद राहतील. त्यामुळे पंजाबमधील बँकांना कोणत्याही दिवशी सुट्टी असेल, तर महाराष्ट्रातील बँकाही त्या दिवशी बंद राहतील, अशी गरज नाही.
  
बँका कोणत्या दिवशी बंद राहतील?
रविवार, 1 ऑक्टोबर  2023 रोजी देशभरात बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर 2023 रोजी गांधी जयंतीनिमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
रविवार, 8 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
14 ऑक्टोबर 2023 रोजी कोलकातामध्ये महालयामुळे आणि दुसऱ्या शनिवारी संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
रविवार, 15 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात बँकेला सुट्टी असेल.
गुवाहाटीमध्ये 18 ऑक्टोबर 2023 रोजी काटी बिहूनिमित्त बँका बंद राहतील.
21 ऑक्टोबर 2023 आगरतळा, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता येथील बँकांना दुर्गापूजा/महा सप्तमीनिमित्त सुट्टी असेल.
रविवार, 22 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
24 ऑक्टोबर 2023 दसऱ्यामुळे हैदराबाद आणि इंफाळ वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
25 ऑक्टोबर 2023 गंगटोकमध्ये दुर्गापूजेमुळे (दसई) बँका बंद राहतील.
गंगटोक, जम्मू आणि श्रीनगरमध्ये 26 ऑक्टोबर 2023 रोजी दुर्गा पूजा (दसई)/प्रवेश दिनाला बँका बंद राहतील.
गंगटोकमध्ये 27 ऑक्टोबर 2023 दुर्गा पूजा (दसई) रोजी बँका बंद राहतील.
28 ऑक्टोबर 2023 रोजी कोलकात्यासह संपूर्ण देशात लक्ष्मीपूजन आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.
29 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात बँका बंद राहतील.
31 ऑक्टोबर 2023 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहमदाबादमधील बँकांना सुट्टी असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती