कोरोनाव्हायरस लसीकरणासाठी नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

बुधवार, 10 मार्च 2021 (18:17 IST)
सर्व सामान्यांना कोरोनाव्हारस लस लावण्याची प्रक्रिया भारतात सुरू झाली आहे. सध्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य दिले जाते आहे. या सह 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक जे गंभीर रोगाने ग्रस्त आहेत त्यांनाही लस दिली जात आहे. तथापि, लसीकरण करण्यापूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची प्रकिया अगदी सोपी आहे. चला तर मग नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊ या.
 
* सर्वप्रथम www.cowin.gov.in/home या संकेत स्थळावर क्लिक करा.  
 
* इथे आपल्याला Register Yourself चे बटण दिसेल  https://selfregistration.cowin.gov.in/ त्यावर क्लिक करा.  
 
* आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा. या नंतर GET OTP वर क्लिक करा.
 
* दिलेल्या मोबाईल नंबर वर एक एसएमएस येईल ज्यामध्ये OTP नंबर असेल तो OTP नंबर त्या मध्ये टाईप करा आणि VERIFY वर क्लिक करा.
 
* या नंतर Photo ID Proof वर क्लिक करून पर्याय निवडा.
आपण (आधार कार्ड/ड्राइविंग लायसेन्स/पॅनकार्ड/पासपोर्ट/पेन्शन पास बुक) या पैकी काही एक ID proof  म्हणून देऊ शकता.
* निवड केलेल्या ID Proof चा क्रमांक तिथे प्रविष्ट करा. उदाहरणार्थ आपण (आधारकार्ड ची निवड ID Proof म्हणून केली आहे तर आपला 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा).   
* निवड केलेल्या ID नंबर टाईप करा.
* ID मध्ये लिहिलेले नाव प्रविष्ट करा.
* लिंग निवडा (मेल/फीमेल).
*जन्माचे वर्ष टाईप करा. (YYYY).
* Register वर क्लिक करा.
 
** आता आपल्याला अकाउंट्स डिटेल्स दिसेल इथे Shedule Now वर क्लिक करून आपल्यासाठी प्रथम लसीकरणाची वेळ निवडू शकता.
 
* इथे Add More चे ऑप्शन देखील आहे, आपण आपल्यासह या मोबाईल नंबर वरून एकूण चार लोकांसाठी देखील लसीकरणाची नोंदणी करू शकता.
 
* Appointment बुक केल्यावर राज्य आणि जिल्ह्याची निवड करा. आपण यासाठी आपल्या क्षेत्राच्या पिनकोडची निवड देखील करू शकता.  
या नंतर Search वर क्लिक करा.
 
* केंद्राची निवड करा, तारीख बघा आणि BOOK वर क्लिक करा.
 
* दिलेल्या तपशील ला तपासून बघा आणि नंतर Confirm वर क्लिक करा.
 
अशा प्रकारे आपली प्रथम डोझ किंवा लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. नोंदणी झाल्याची पुष्टी आपल्याला एसएमएस द्वारे दिली जाईल.
या सह दुसऱ्या डोज साठी ची नोंदणी देखील आपोआप केली जाईल.
आपण आपल्या लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र देखील या लिंक वरून डाउनलोड करू शकता.
 दुसरी प्रक्रिया -
* 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक थेट लसीकरण केंद्रावर जाऊन देखील आधार कार्डाने नोंदणी करू शकतात.
* नोंदणी केल्यावर शुल्क देऊन आपण रसीद मिळवा.
* रसीद दाखवून लस घ्या.
* लस दिल्यावर आपल्याला काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल.
* दुसऱ्या डोज ची तारीख देखील त्वरितच देण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती