चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय

शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (08:48 IST)
बहुचर्चिच चारा घोटाळा प्रकरणावर आज अंतिम निर्णय येणार आहे. या घोटाळ्यात आरोपी असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, जगन्नाथ मिश्र यांसारख्या दिग्गजांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. चारा घोटाळ्यात इतर 22 जणांवरही आरोप आहे. रांचीमधील सीबीआयचं विशेष कोर्ट या प्रकरणी आज निकाल देईल. 
 
या घोटाळ्यात भाजपानेच आपल्याला फसवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पण, न्याय व्यवस्थेवर आपला पूर्ण भरवसा असून या प्रकरणात आपल्याला नक्की न्याय मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. 
 
याआधी 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर केस चालविण्याचा राज्यपालांनी दिलेला आदेश रद्द केला. त्यामुळे लालूप्रसाद ही सुटतील असे बोलले जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती