लालू, तेजस्वींना पुन्हा सीबीआयकडून समन्स

सीबीआयने राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यांना चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावले आहे. या पिता-पुत्रांना अनुक्रमे 25 आणि 26 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. लालू रेल्वेमंत्री असताना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) दोन हॉटेल्सची देखभाल करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. त्या प्रक्रियेत अनियमितता आणि लाचखोरी झाल्याचा आरोप आहे. हॉटेल देखभालीचे कंत्राट मिळवण्यासाठी संबंधित कंपनीने लालूंच्या कुटूंबीयांना पाटण्यात तीन एकर जमीन दिल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यावरून लालू आणि तेजस्वी सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यांना याआधीच चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, हजर न राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती