आठ मुलींनंतर 82 व्या वर्षी पीठाधीपतींना झाला मुलगा

कलबुर्गी- उत्तर कर्नाटकातील एका मठाच्या पीठाधीपतींना वयाच्या 82 व्या वर्षी मुलगा झाला आहे. आठ मुलींनंतर मुलाचा मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. पीठाधीपतींचे हे नववे अपत्य आहे. शरणबसप्पा अप्पा हे कलबुर्गीतील शरण बसवेश्वर संस्थान या मठाचे पीठाधीपती आहे.
 
शरणबसप्पा यांच्या दुसर्‍या बायकोने बुधवारी मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. शरणबसप्पा आणि त्यांच्या पहिल्या बायकोला पाच मुली आहेत तर दुसर्‍या बायकोला तीन मुली असून आता चौथा मुलगा आहे. शरणबसप्पा यांचा मुलगा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
 
या बाळाला पाहाण्यासाठी शहरातील लोकांनी मठात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पण मठातील अधिकार्‍यांनी काही कारण देत लोकांना तेथून परत पाठवले. शरणबसप्पा अप्पा यांचा पुतण्या लिंगराजप्पा अप्पा यांनी मुलाच्या जन्माने आम्ही सगळे आनंदी असल्याचे सांगितले. तसेच मुंबईतील हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शरणबसप्पा त्यांच्यानंतर मठाची सूत्र सांभळण्यासाठी मुलाच्या प्रतिक्षेत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती