मिळालेल्या माहितीनुसार, उमा आणि तिचा पार्टनर राजकुमार एकत्र कार्यक्रम आयोजित करण्याचे काम करतात. मंगळवारी सकाळी उमा आणि राजकुमार जाट एका क्लबमध्ये होते. पहाटे पार्टी आटोपून परतत असताना मंगेश आणि दुसरी मुलगी क्लबबाहेर त्यांच्या कारमधून जात होते.क्लबच्या बाहेर मंगेशने उमा यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, ज्याला दोघांनी विरोध केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जवाहरनगर पोलिस ठाण्यात ही घटना घडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून, त्यात चारही जण आपापसात भांडताना दिसत आहेत. चारही जण एकमेकांना ओळखत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.