इस्रोचे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) पुढील महिन्यात दुसरे उड्डाण करू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. त्याचवेळी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी 108 व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी तुम्हाला कोणतीही अचूक तारीख सांगू शकत नाही, परंतु आम्ही पुढील महिन्यात चाचणी उड्डाणाची योजना आखत आहोत.
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, चंद्रावर लँड रोव्हर पाठवण्याचा प्रयत्न करण्याव्यतिरिक्त भारत यावर्षी मंगळ आणि शुक्रावर वैज्ञानिक मोहिमा पाठवण्याची योजना आखत आहे. ते पुढे म्हणाले की, चांद्रयान-3 अंतराळयान ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरसह जवळजवळ तयार आहे. पण आम्ही जूनमध्ये मिशन सुरू करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहोत. यावेळी यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, स्पेस एजन्सी पुढील महिन्यात SSLV वर उपग्रह-आधारित ऑटोमॅटिक डिपेंडेंट सर्व्हिलन्स-ब्रॉडकास्ट (ADS-B) रिसीव्हर सिस्टमची चाचणी करेल. पुढील महिन्यात एसएसएलव्ही चाचणी उड्डाणात स्पेस-आधारित एडीएस-बी प्रणालीची चाचणी घेतली जाईल