आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरून पाच तरुणांना केरळमधून स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कन्नूर भागात २५ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आयसिसच्या संपर्कात असलेले भारतीय तरुण परदेशातून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. या पाच जणांना ताब्यात घेतल्यानंतर कन्नूरचे पोलीस उपअधीक्षक पी. पी. सदानंदन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांची कसून चौकशी केली. यावेळी हे तीघेही तुर्कस्तानातून भारतात परतल्याचे समोर आले आहे. केरळमधील वेलापट्टणम आणि चक्करकल या भागातील ते मुळचे रहिवासी आहेत.