कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मिश्रा यांच्या नियुक्तीला 31 ऑक्टोबर 2026 रोजी निवृत्त होईपर्यंत मान्यता दिली आहे. त्या 31जुलै रोजी निवृत्त होणाऱ्या विद्यमान महासंचालक मनोज यादव यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिश्रा आरपीएफचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. इतर कर्तव्यांव्यतिरिक्त, आरपीएफ रेल्वे मालमत्तेची आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेते.
सोनाली मिश्रा सध्या मध्य प्रदेश पोलिसात अतिरिक्त महासंचालक (निवड) आहेत. त्या जबलपूरमध्ये डीआयजी होत्या आणि पोलिस मुख्यालयात आयजी इंटेलिजेंस म्हणूनही काम केले आहे. त्यांनी बीएसएफ मुख्यालय, दिल्ली आणि काश्मीर खोऱ्यातही काम केले आहे. जालंधर येथील सीमा सुरक्षा दल (BSF) पंजाब फ्रंटियरमध्ये त्या आयजी म्हणून तैनात आहेत. त्या गुप्तचर विभागाच्या आयजी देखील राहिल्या आहेत.